नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनची तारीख जाहीर झाली आहे. १८ जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे.
देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीसारखे अनेक प्रश्न अधिवेशनात मांडले जाऊ शकतात. तसेच देशभरातून विरोध केल्या जाणा-या अग्निपथ योजनेवरूनही विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीचे पावसाळी अधिवेशनही विविध विषयांनी चांगलेच गाजले होते. शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ विषयांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाने सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारने ती परवानगी नाकारली त्यामुळे विरोधी पक्षांनी अधिवेशनात गदारोळ घातला होता.