20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home राष्ट्रीय संसद अधिवेशन ८ दिवस आधी गुंडाळणार?

संसद अधिवेशन ८ दिवस आधी गुंडाळणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑक्टोबरपूर्वीच गुंडाळण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता आहे. अगोदरच ३० खासदारांना कोरोना झाला. त्यातच अधिवेशन काळात दोन मंत्री आणि एका खासदारालाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे एक आठवडा अगोदर अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी वर्तवली आहे. पुढील आठवड्यात बुधवारी किंवा गुरुवारी संसदेचं पावसाळी अधिवेशन संपू शकते.

देशात कोरोना रुग्णांची संख्या ५३ लाखांवर पोहोचली आहे. त्यातच संसद सदस्य आणि कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण होत आहे. याचा विचार करून अधिवेशन एक आठवडा अगोदर गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे अधिवेशन १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होते. यासंदर्भात संसदेच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोना पॉझिटिव्ह खासदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार करीत आहे.

लोकसभेचे सभापती प्रमुख असलेल्या बीएसीची (बिझनेस अ‍ॅडव्हायजरी कमिटी) आज संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. संसद अधिवेशनाच्या कालावधीबाबत सरकार आणि विरोधी पक्षातही चर्चा झाली. बीएसीच्या बैठकीत संसदेचं पावसाळी अधिवेशन लवकरच संपवण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात एकमत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संसद अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन मंत्री आणि भाजपचा एक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे संसेदचे पावसाळी अधिवेशन नियोजित वेळेपूर्वी संपवण्यावर विचार केला जात आहे.

भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यसभेत भाषण केले. नंतर कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केलेल्या तपासणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्याचप्रमाणे नितीन गडकरी आणि प्रल्हाद पटेल यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सरकारचीच नव्हे, तर सर्वच पक्षांच्या संसद सदस्यांची चिंता वाढली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ट्विट करून आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. गडकरींच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते बरे झाले आहेत.

१४ सप्टेंबरपासून सुरू झाले होते अधिवेशन
संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आले. यानंतर दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत कामकाज झाले. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. यानंतर, रोज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कामकाज घेण्यात आले. या अधिवेशनात शनिवार आणि रविवारीही सुटी नाही. पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबरपर्यंत घेण्याचे नियोजन आहे. मात्र, ते आधीच संपण्याची शक्यता आहे.

पत्रकारांची रोज अ‍ँटिजन टेस्ट
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिवेशनासाठी संसदेत प्रवेश करणा-या पत्रकारांना सरकारने रोजच रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट अनिवार्य केली आहे. यासोबतच संसदेत प्रवेश करणा-या कर्मचा-यांसाठीही ही टेस्ट अनिवार्य आहे. तसेच खासदारही कितीही वेळा आरटीपीसीआर टेस्ट करू शकतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून याची काळजी घेण्यात आली आहे.

चीनसाठी हेरगिरी, पत्रकाराला अटक; प्रत्येक माहितीसाठी घ्यायचा १ हजार डॉलर्स

ताज्या बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

आणखीन बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...