25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय पार्थो दासगुप्ताचा जामीन फेटाळला

पार्थो दासगुप्ताचा जामीन फेटाळला

एकमत ऑनलाईन

मुंबई : बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे.

टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता.

दरम्यान, गेल्या महिन्यात पुण्यातून अटक केल्यानंतर पार्थो दासगुप्ता (५५) यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. त्यानुसार कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी वाढवली होती. त्यावेळी गुन्हे शाखेने गोस्वामी-दासगुप्ता यांच्यात घडलेल्या आर्थिक व्यवहाराबाबतही माहिती दिली. टीआरपी वाढविण्यात सर्वतोपरी सहकार्य करत असल्याबद्दल पार्थो यांना अर्णब हे लाखांची लाच देत होते. त्यातून दासगुप्ता यांनी मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता व दागिने विकत घेतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

 

मोदी, शहा, भाजप कार्यालयाची सुरक्षा वाढवली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या