नवी दिल्ली : केंद्र सरकारने पासपोर्ट सेवेत बदल केले असून, या नव्या नियमावलीमुळे पासपोर्ट लवकर मिळण्याची सोय झाली आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना काही पर्याय निवडावे लागणार आहेत.
त्यासाठी सर्वप्रथम तात्काळ पासपोर्टचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. कारण केंद्र सरकारने तात्काळ पासपोर्टच्या वेळेत बदल केला आहे. नव्या नियमावलीनुसार ३ दिवसच वाट पाहावी लागणार असून, तिस-या दिवशी घरपोच मिळेल.