21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयपासपोर्टसाठी मुळ कागदपत्रांची गरज नाही

पासपोर्टसाठी मुळ कागदपत्रांची गरज नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात पासपोर्ट वितरण प्रणाली अधिकाधिक सुलभ होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. आता या योजनेचा एक भाग आहे. नव्या योजनेनुसार आता डिजीलॉकर सेवा परराष्ट्र मंत्रालयाकडून सुरु करण्यात आली आहे. डिजिलॉकर सेवेमुळे आता आता डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट्सची लिंक पासपोर्टसाठी देता येईल. परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि पासपोर्ट सुविधा पेपरलेस करण्यासाठी ही सुविधा सुरू केली आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या सेवेमुळे देशातील नागरिकांना कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येईल.

या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालय लवकरच ई-पासपोर्ट सुविधाही सुरु करणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षा मिळेल. परदेशी विमानतळांवरही इमिग्रेशन प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या आगामी ढं२२स्रङ्म१३ री५ं ढ१ङ्मॅ१ेंी श्2.0 या योजनेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, चॅटबॉट्स, रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना अधिक प्रभावी पद्धतीनं आणि सहजरित्या पासपोर्ट सेवा मिळणार आहे.

काय आहे डिजिलॉकर?
डिजीलॉकर हा एक प्रकारचा व्हर्च्युअल लॉकर आहे. ज्यामध्ये आपल्याला एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्माचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, लाईफ इंश्योरन्स पॉलिसी, हेल्थ पॉलिसी, वाहन पॉलिसी, पॅन कार्ड, वोटर आयडी सहित पॉलिसी डॉक्युमेंट्स अशी अनेक महत्त्वाची कागदपत्रे ड़िजिटल पद्धतीने संग्रहित करता येतील. जुलै २०१५ मध्ये नागरिकांसाठी डिजिलॉकरची सेवा सुरु करण्यात आली होती. यामध्ये नागरिकांना १ जीबी पर्यंतच्या स्पेसचा वापर करता येतो. हा डिजिलॉकर आधार क्रमांकाशी ंिलक असतो.

डिजिलॉकर डॉक्युमेंट्स कशी सेव्ह कराल
डिजिलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स संग्रहित करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्कॅन करावी लागतील. फोटो घेऊनही ते फोटो डिजिलॉकरमध्ये सेव्ह करता येतील. डिजिलॉकरमध्ये संक्षिप्त माहितीही लिहिता येते. आपल्याला त्यानंतर डिजिलॉकर सुरू करण्यासाठी https://digilocker.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर फोन नंबर आधार कार्डसह लिंक आहे की नाही? याची पाहणी करावी लागेल. फोन क्रमांक आधार क्रमांकाशी रजिस्टर नसेल तर या सुविधेचा वापर करता येणार नाही.

पामेला-ड्रग्ज प्रकरणी दोन अटकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या