27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयआता रेशन दुकानातूनही काढता येणार पासपोर्ट, पॅन कार्ड

आता रेशन दुकानातूनही काढता येणार पासपोर्ट, पॅन कार्ड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांची पायपीट थांबावी तसेच, त्यांना अधिकाधिक सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार आता तुम्ही रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. इतकेच नाही, तर वीज आणि पाण्याचे बिलदेखील रेशन दुकानांमध्ये स्विकारले जाणार आहे. हो हे खरे आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडसोबत ही योजना तयार केली आहे.

देशातील सर्व रेशन दुकाने आता कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) बनवली जाणार असून, अनेक सुविधा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. यानुसार सामान्य नागरिकांना आता रेशन दुकानात पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. रेशन धान्य दुकान चालवणा-या दुकानदारांना सुविधा पुरविण्याबाबत निवड करता येणार आहे.

रेशन दुकानदारांसमोर पर्याय
रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. सीएससी अंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा
या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून, या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, यामुळे रेशन दुकानांचे उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या