28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय रुग्णांनी ओलांडला २१ लाखांचा टप्पा

रुग्णांनी ओलांडला २१ लाखांचा टप्पा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने २१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसागणिक वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. देशात २१ लाख ५३ हजार ११ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्या म्हणजेच ६४ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतसंख्या ४३ हजार ३७९ वर पोहोचली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दुपटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत बरे झालेल्या ळपान ५ वर
रुग्णांची संख्या १४ लाख ८० हजार ८८५ इतकी आहे. चिंतेची बाब म्हणजे एकूण कोरोनाबळींची संख्या ४३ हजार ३७९ इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण उत्तम असल्याने रिकव्हरी रेट ६८.७८ टक्के, तर मृत्यू दर २.०१ टक्के आणि अ‍ॅक्टिव्ह केसचे प्रमाण २९.२० टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

राज्यात १३ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त
ळराज्यात आज पुन्हा एकदा एकाच दिवशी १३ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात करण्यास यश मिळवले आहे. बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण दिलासादायक असून, आतापर्यंत एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्णांनी कोरोनाला हरवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.२५ टक्के इतके आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज तब्बल ३९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना मृतांचा आकडा १७ हजार ७५७ इतका झाला आहे, तर १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अर्थव्यवस्थेचा ‘हे राम’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या