26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयविदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

विदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आता एफडीए आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणतीही लस भारतात आणली जाऊ शकते, असे नीति आयोगाकडून सांगण्यात आले. तसंच १ ते २ दिवसांच्या आत आयात परवाना दिला जाईल. सध्या कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही, अशी माहिती गुरुवार दि़ १३ मे रोजी नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी दिली.

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम १६ जानेवारीपासून भारतात सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचे राज्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही राज्यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचे लसीकरण तुर्तास थांबवून ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या परिस्थितीत नीति आयोगाकडून गुरूवारी मोठे वक्तव्य आले आहे. भारतात लस उत्पादन करण्यासाठी कंपन्या पुढे येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय कंपन्यांना देशातच भारतीय कंपन्यांसोबत लसीच्या उत्पादनासाठी बोलावण्यात आले आहे. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यापर्यंत भारतात २१६ कोटी डोस उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही पॉल यांनी व्यक्त केली.

अनेक निर्मात्यांशी भारत संपर्कात
डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी सोबत अन्य विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय सातत्याने फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या संपर्कात आहे, असे पॉल हणाले. ते लसींचे डोस निर्यात करतील का किंवा भारतात त्याचे उत्पादन करतील असे त्यांना विचारण्यात आले आहे. या तिन्ही कंपन्या जुले ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीपर्यंत लस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्पुटनिकचे जुलैपासून भारतात उत्पादन
देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारनं निर्णायक पाऊल उचललं आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे़ रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली आहे. आता ही लस पुढील आठवड्यापासून बाजारांमध्ये उपलब्ध होईल. रशियातून मर्यादित स्वरूपात आलेला ही लस पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होईल, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. दरम्यान, स्पुटनिक या लसीचे जुलै महिन्यापासून भारतात उत्पादन होईल, अशी माहितीही समोर आली आहे.

डुप्लीकेट रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीचा पर्दाफाश; बार्शी तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या