24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयदुस-या व तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

दुस-या व तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

एकमत ऑनलाईन

सिरमची लस, सीडीएससीओची अखेर परवानगी

नवी दिल्ली : भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांंनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टिट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिका-याने दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्यूूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितले होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ­ॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

चाचण्यांमध्ये लसीचे सकारात्मक निकाल

ऑक्सफर्डच्या या लसीने आतापर्यंत चांगली प्रगती केली आहे. तसेच ऑक्सफर्डच्या ज्या लसीवर संशोधन सुरू आहे त्याचे सुरुवातीचे निकाल उत्तम आहेत. तसेच ही लस सुरक्षितही आहे, अशी माहिती लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलने आपल्या अहवालात दिली आहे. ऑक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटयट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सुरूवातीच्या चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद असल्याचे म्हटले होते.

Read More  दुधाच्या दरवाढीकरिता मनसेचे अनोखे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या