28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयइतर राज्यांकडे लक्ष द्या; केंद्र सरकारला ‘सर्वोच्च’ सल्ला

इतर राज्यांकडे लक्ष द्या; केंद्र सरकारला ‘सर्वोच्च’ सल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देशातील परीस्थिती बिघडत चालली आहे. देशात वैद्यकीय साधनांची कमतरता भासत आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनची टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्रामीण भागांसह इतर राज्यांकडेही लक्ष द्यावे असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गुरुवार दि़ ६ मे रोजी ऑक्सिजन संकटाबाबत सुनावणी दरम्यान दिला़

आज झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्राने न्यायालयात म्हटले आहे की, त्यांच्या सर्वेक्षणानुसार सध्या दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन आज २८० मेट्रिक टन ऑक्सिजन आणत आहे. दिल्लीच्या ५६ प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे. तसेच दिल्ली सरकारने ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली होती. यावर केंद्राने न्यायालयात भूमिका मांडली. जर दिल्लीला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिले जात असेल तर इतर राज्यात कमतरता भासेल. दिल्लीच्या ५६ प्रमुख रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्याकडे पुरेसा साठा आहे.

ऑक्सिजन वितरणासाठी योग्य नियोजन असावे
ऑक्सिजनचे योग्य ऑडिट आणि वितरणासाठी योग्य चौकट असणे आवश्यक आहे. त्यामुळे इतर राज्यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असे सरकारला न्यायालयाने सुचविले. आपण आता दिल्लीकडे पाहत आहोत. पण ग्रामीण भागाचे काय, जेथे बहुतेक लोक समस्येला तोंड देत आहेत. तुम्हाला राष्ट्रीय धोरण बनवण्याची गरज आहे. तुम्ही आजची परिस्थिती पाहत आहात. पण आम्ही भविष्याकडे पाहत आहोत, त्यासाठी तुमची काय योजना आहे? न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायालयात काही प्रश्न उपस्थित केले.

केंद्राचे दावे न्यायालयाने खोडले
यावर न्यायमूर्ती शाह म्हणाले, तुम्ही जेव्हा हे दावे करीत असता, तेव्हा बरीच मोठी रुग्णालये न्यायालयात अशी विनवणी का करतात की आमच्याकडे केवळ दोन किंवा तीन तासांचे ऑक्सिजन शिल्लक आहे? यावर केंद्राने म्हटले आहे की ऑक्सिजन ऑडिट करणे आवश्यक आहे. पुरवठा केला जात आहे. परंतु तो लोकांपर्यंत पोहोचत नसेल. तर याचा अर्थ काही दिल्लीच्या काही भागात काहीतरी गडबड आहे.

आता अ‍ँटीबॉडी कॉकटेलद्वारे उपचार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या