21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयदेशभरातील पेटीएम सर्व्हिस डाऊन

देशभरातील पेटीएम सर्व्हिस डाऊन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात आज सकाळी पेटीएम सेवा डाउन झाल्याचे पाहायला मिळाले. पेटीएम वरून डिजिटल पेमेंट करताना लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी पेटीएमला ट्विटवर सांगितले की त्यांचे खाते ऍपवरूनच लॉग आउट झाले आहे. त्यानंतर त्या लोकांचे पैसे ट्रान्सफर होत नाहीत. या संदर्भात खुद्द पेटीएमकडून माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पेटीएम कंपनीकडून ट्विटद्वारे माहिती सर्व्हीस डाऊन असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले की नेटवर्क त्रुटीमुळे अनेकांना लॉग इन करण्यात अडचण आली आहे. तर अनेकांना पेमेंटही करता आले नाही. नेटवर्क त्रुटीमुळे, हे झाले असून आम्ही या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी काम करत आहोत. त्याचे निराकरण होताच आम्ही तुम्हाला कळवू असेही पेटीएमच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या