20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयपेगॅसस हेरगिरी; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

पेगॅसस हेरगिरी; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस प्रकरणावरुन प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधक याप्ररणी चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर दाखल याचिकेवर सुनावणी होईल. शुक्रवार दि़ ३० जुलै रोजी सीजेआआय एनवी रमना यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी मुख्य न्यायमुर्तीं रमना यांच्यासमोर पत्रकार एन.राम यांच्याकडून दाखल याचिकेचा उल्लेख केला. तसेच, पेगॅससमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असून, कोर्टाने यावर तात्काळ सुनावणी करावी, अशी मागणी केली. यानंतर रमना यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी करण्यास हिरवा कंदिल दाखवला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत न्यायालयातील एक विद्यमान आणि एक निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे पेगॅसस प्रकरण?
काही दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खुलासा केला होता की, इस्रायलमधील पेगाससस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतासह जगातील अनेक देशांमधील पत्रकार, नेते आणि मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले. भारतात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर, पत्रकार एन. राम यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केल्याचे त्या रिपोर्टमधून सांगण्यात आले. ती रिपोर्ट समोर आल्यापासून विरोधक सरकारवर सतत निशाणा साधत आहेत.

आजपासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार पैसे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या