डेहराडून : २२ एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून ८ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांना भेट दिली आहे. दररोज ४० हजार यात्रेकरू चारधाम येथे पोहोचत आहेत. त्याचबरोबर केदारनाथ यात्रेसाठी दररोज ३० हजारांहून अधिक नोंदणी केली जात आहे. उत्तराखंड टुरिझमने मंगळवारी ही माहिती दिली.
मात्र उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे केदानाथच्या नवीन नोंदणीवर पुन्हा एकदा २५ मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे जोशीमठच्या जनतेवर सर्वात मोठे संकट कोसळले आहे. कारण तडे गेलेल्या घरांमधून हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या लोकांना हॉटेल मालकांनी खोल्या रिकाम्या करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या लोकांना मजबुरीने घरी परतावे लागले आहे.