27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयलहान मुलांसाठी चौथ्या लस चाचणीला परवानगी

लहान मुलांसाठी चौथ्या लस चाचणीला परवानगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना हैदराबादची स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने काही अटींसह दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. या चाचण्या ५ ते १८ वर्षांच्या मुलांवर केल्या जातील. देशात १० ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत. डीसीजीआयकडून मुलांवर चाचण्यांसाठी परवानगी मिळालेली बायोलॉजिकल ई ही चौथी लस आहे.

डीसीजीआयने विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारे ही परवानगी दिली आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने ३० कोटी लसींसाठी बायोलॉजिकल ई या कंपनीला १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देऊन ठेवली आहे. दरम्यान, झायडस कॅडिलाची सुईमुक्त कोरोना प्रतिबंधक लसीला १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे, तर भारत बायोटेकच्या लहान मुलांसाठी कोवॅक्सिन लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचा निकाल या महिन्यात लागेल, असे म्हटले जात आहे.

लहान मुलांसाठीच्या या आहेत ४ लसी

झायडस कॅडिला
झायडस कॅडिलाच्या लसीला १२ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांवर वापरण्यास आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूयूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड
कोव्हिशिल्ड लसीच्या लहान मुलांवर दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. ही लस २ ते १७ वर्ष वयोगटातील बालकांसाठी असेल.

भारत बायोटेकची कोवॅक्सिन
कोवॅक्सिन लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचण्या सुरू असून ही लस २ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी उपलब्ध असेल.

स्वदेशी बायोलॉजिकल ईची लस
काही अटींसह या लसीच्या दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. या चाचण्या ५ ते १८ वर्षांच्या मुलांवर केल्या जातील.

एसटी कर्मचा-यांचे वेतन मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या