22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयपेट्रोल २०० रुपये झाल्यावर ट्रिपल सीटची परवानगी

पेट्रोल २०० रुपये झाल्यावर ट्रिपल सीटची परवानगी

एकमत ऑनलाईन

दिसपूर : आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी पेट्रोलच्या दरांसंदर्भात भाष्य करताना अजब दावा केला आहे. पेट्रोलचे दर २०० रुपये लिटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा आसामध्ये देण्यात येईल, असे म्हटले आहे. पेट्रोलचे दर लिटर मागे २०० रुपयांवर पोहचल्यानंतर दुचाकी गाड्यांवर तिघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच एका बाईकवर तीन जणांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारकडून सहमती घेण्यात येईल.

दुचाकी वाहनांवर तीन जणांची बसण्याची सोय असणा-या गाड्या निर्माण करण्याची परवानगीही घेता येईल, असे कालिता म्हणालेत. मात्र कालिता यांनी केलेले हे वक्तव्य गांभीर्याने केले की मस्करीमध्ये केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्याच्या कायद्यानुसार दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. मागील तीन दिवस आणि इतर दोन दिवस वगळल्यास रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोल ४.४५ रुपयांनी महाग झाले आहे तर डिझेल पाच रुपयांनी महागले आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या