23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयरणवीरविरोधात कोलकाता न्यायालयात याचिका

रणवीरविरोधात कोलकाता न्यायालयात याचिका

एकमत ऑनलाईन

कोलकाता : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा न्यूड फोटोशूट केल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीला त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले आणि मीम्स बनवले गेले. यानंतर अनेक शहरांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या. आता याच क्रमाने त्याच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यूड फोटोशूट केल्यामुळे सतत चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात जनहित याचिका दाखल करून याचिकाकर्त्याने फोटोशूट पश्चिम बंगाल सरकार आणि या प्रकरणाशी संबंधित इतर सर्व प्राधिकरणांना पाठवण्याची विनंती केली आहे. तसेच मासिकाच्या सर्व छापील प्रती जप्त करण्याचे आदेश देण्याचे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या