नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून एल व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) फेटाळून लावली.
व्हिक्टोरिया या भाजपशी थेट संबंधित आहेत व त्यांनी यापूर्वी अल्पसंख्याक समाजाविरुद्ध अत्यंत वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती न्यायाधीश म्हणून करू नये, अशी मागणी करणारी याचिका २१ वकिलांनी दाखल केली होती, ती न्यायालयाने फेटाळली.