24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयभटक्या कुत्र्यांना ठार मारण्यासाठी याचिका

भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यासाठी याचिका

एकमत ऑनलाईन

कोची : केरळमध्ये भटक्या कुर्त्यांच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून नागरिकांवरील या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने त्यांना ठार मारण्याची परवानगी मिळावी म्हणून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याच्या तयारीत आहे.

कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांना रेबीज झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतचा एक विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून त्यावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे. स्थानिक प्रशासनमंत्री एम.बी. राजेश यांनी आज ही माहिती दिली. याच भटक्या कुत्र्यांनी सोमवारी एका महिलेला चावा घेतला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या