22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयसेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका

सेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील राज्य कारभार पाहणारी संस्था संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला (सेंट्रल व्हिस्टा) काही काळापर्यंत स्थगिती देण्याबाबत याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल झाली असून कोरोना संकटाच्या काळात आरोग्य व्यवस्थेच्या सुदृढीकरणावर भर देण्याची गरज असून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प काही काळासाठी स्थगित ठेवला जावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.

याचिकाकर्त्याचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी याबाबत कोर्टात भुमिका मांडली. सेंट्रल व्हिस्टा ही योजना जानेवारीत सुरु झाली. पण सध्या कोरोनाच्या उद्रेकानंतर देशातील परिस्थिती खूपच बदलली आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी व तोकडेपणा स्पष्ट जाणवत आहे. नागरिक व बांधकाम मजूर आदींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन हा प्रकल्प पुढे रेटण्यात काहीच अर्थ नसून या प्रकल्पाला सध्या स्थगिती द्यावी, असे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. दुसरीकडे सॉलिसिटर जनरल यांच्या कडून आता यावेळी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प स्थगित करण्याची मागणी ही चांगल्या हेतूने केलेली नाही. संकटाच्या काळात कोर्टापुढे वाईट हेतूने मागणी करणे हे निश्चितच देशहिताचे नाही, असे मत मांडण्यात आले.

कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला मनोदय प्रकट केला. सध्या या प्रकल्पावर स्थगितीबाबत दिल्ली उच्च न्याालयातच अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. संबंधित याचिकाकर्त्यांनीह उच्च न्यायालयातच जाऊन याचिका सादर करावी, असे सुनावले.

मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हणजे तिघाडी सरकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या