26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयपेट्रोल-डिझेलचे दर खाली येतील

पेट्रोल-डिझेलचे दर खाली येतील

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि इंधनाचे चढे दर अशा कात्रीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली घसरतील, असे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.

नवी दिल्लीत रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रधान यांनी ही माहिती दिली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर आता कमी व्हायला सुरुवात होईल. आगामी काही दिवसांमध्ये ते दिसून येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर घसरल्यानंतर आम्ही त्याचा फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत हस्तांतरित करायला सुरुवात केली होती. त्याचे परिणाम आता दिसून येतील, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. त्यामुळे कोरोना संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य लोकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सलग पाचव्या दिवशी दर स्थिर
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंडियन आॅईलच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी, गेल्या १० दिवसांत तेल कंपन्यांनी किंमती ३ वेळा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

पंतप्रधानांकडून तातडीच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या