नवी दिल्ली : कृषि क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली. पेट्रोलवर २.५ रुपये, तर डिझेलवर ४ रुपये अधिभार आकारला जाणार आहे. या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
कृषि क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावण्याची तरतूद केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली. हा अधिभार आकारताना याचा ग्राहकांवर भार पडू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. मूळ उत्पादन शुल्क आणि विशेष अतिरिक्त शुल्काच्या दरात कपात करण्यात आली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
चाहत्यांसाठी खुश खबर; आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार