23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeउद्योगजगतडिजिटल पेमेंटमध्ये फोन पेचा वरचष्मा

डिजिटल पेमेंटमध्ये फोन पेचा वरचष्मा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात सध्या डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक सध्या युपीआयची (यूपीआय) मदत घेताना दिसतात. कोरोना काळात डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात फोन पेद्वारे १४९२ दशलक्ष लोकांनी पेमेंट केले. यानंतर गुगल पेद्वारे १११९.२ दशलक्ष लोकांनी पेमेंट केले. तर या यादीत तिसरा क्रमांक हा पेटीएमचा लागतो.

याच्या मदतीने कोणत्याही खात्यावर त्वरित पैसे पाठवता येतात. यामुळे, निधी हस्तांतरण एनईएफटीपेक्षा कमी वेळ घेते. एका मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवरून अनेक बँक खात्यांमधून व्यवहार व्यवहार करता येतात. यामध्ये बँकेने दिलेला व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस वापरला जातो. आयएफएससी कोड आणि मोबाईल नंबर वापरून रक्कम हस्तांतरित केली जाते. पेमेंट अधिकृत करण्यासाठी एम-पिन(मोबाईल पिन) आवश्यक आहे.

इंटरनेट कनेक्शनशिवाय फोनमध्ये 99# डायल करून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. प्रत्येक बँकेत एक यूपीआय प्लॅटफॉर्म आहे, जो मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार विकसित केला जातो. यात बिल शेअरिंग सुविधादेखील आहे. वीज-पाण्याचे बिल भरणे, दुकानदाराला पैसे देणे इत्यादीसाठी ही सेवा अतिशय सोयीस्कर आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारेच यासंदर्भात काही तक्रार असेल तर तीदेखील करता येते.

पाऊस परतला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या