22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयशिंदे-फडणवीस सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेनेने शिंदे गटाविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. त्यानंतर आता नवी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताना राज्य घटनेच्या १० व्या परिशिष्टाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. २२ ऑगस्टला यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मतदारांचीही मत न्यायालयाने ऐकून घ्यावीत अशी विनंती या याचिकेतून न्यायालयाला करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या