जयपूर : सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांसह देशपातळीवरीलही राजकारण तापले आहे. देशात भाजपसह काँग्रेस आणि विविध राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही राज्यातील काँग्रेस नेते नाराज आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री गेहलोत हे राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची बोलले जात आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर राज्याची धुरा पायलट यांच्याकडे सोपवली जाणार आहे असे असूनही मु्ख्यमंत्री गेहलोत राज्यसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राज्यातील १३ आमदारांपैकी १० अपक्ष आमदारांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री गेहलोत आणि काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारांची भेट घेतली आहे. दरम्यान, या बैठकीत राजस्थानमध्ये १० जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.