ओडिशा : ओडिशा येथील ढेंकनाल येथे एका शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे. या अपघातात शिकाऊ वैमानिक महिलेसह तिच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
बिरसाला येथील सरकारी विमान प्रशिक्षण संस्थेचं हे विमान होतं. या संस्थेच्या शिकाऊ विमानाने सकाळी साडे सहा वाजता उड्डाण केलं होतं. मात्र, उड्डाणाच्या काही मिनिटानंतरच हे विमान कोसळलं. या भीषण अपघातात अनीस फातिमा या शिकाऊ महिला वैमानिकासह संजय कुमार झा या प्रशिक्षक वैमानिकाचाही मृत्यू झाला आहे.
या अपघाताचं कारण अद्याप अज्ञात आहे. विमानात काही बिघाड झाल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघात स्थळावरून दोन्ही मृतदेह हलवण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
Read More आजपासून सुरु होणार धार्मिक स्थळं !