27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयचीन, पाककडून सीमेबाबत सुनियोजित कट

चीन, पाककडून सीमेबाबत सुनियोजित कट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताच्या उत्तर आणि पूर्व सीमेवर तणाव कायम आहे. चीन आणि पाकिस्तानकडून अशी स्थिती निर्माण केली जात आहे. सीमावाद एका मोहिमेंतर्गत निर्माण केला जात असून, चीन आणि पाकचा कट असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवार दि़ १२ आॅक्टोबर रोजी म्हणाले. या दोन्ही देशांकडून असलेल्या धोक्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या उत्तर आणि पूर्व सीमेवर जी परिस्थिती निर्माण केली आहे़ त्याची तुम्हाला कल्पना असेल. आधी पाकिस्तान आणि आता चीन. एका मिशनतंर्गत सीमावाद निर्माण केला जात आहे़ या दोन्ही देशांसोबत आपली सात हजार किलोमीटरची सीमारेषा आहे. तिथे नेहमीच तणाव असतो, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. चीनला लागून असलेल्या पूर्व लडाख सीमेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. पाकिस्तान बरोबर नेहमीच संघर्ष सुरु असतो. काही दिवसांपूर्वी एअर फोर्स प्रमुखांनी हवाई दल एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले होते.

राजनाथ सिंह यांनी केले ४४ पुलांचे उद्घाटन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (सोमवार) लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात उभारण्यात आलेल्या ४४ पुलांचे ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे उद्घाटन केले.

कोरोनामुळे शाळकरी मुलांचे गणवेश वाटप रखडले

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या