नवी दिल्ली : कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत चालू असलेले आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. विरोधी पक्षाने शेतक-यांना पाठिंबा दिलेला आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयानेही कृषी केंद्रसरकारला सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुरुद्वारा भेट पॉलिसी सुरु झाल्याचे दिसत आहे. रविवारी सकाळीच पंतप्रधान मोदी यांनी रकाबगंजमधील गुरुद्वाराला भेट देत आंदोलक शिख शेतक-यांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
रायसीना हिल्सच्या मागील बाजुला स्थित या रकाबगंज गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून शीख समागम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळीच गुरुद्वाराला भेट दिली. माथा टेकत गुरु तेग बहादूर यांना नमन केले. पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून इंग्रजीसोबतच पंजाबी भाषेतही माहिती देण्यात आली आहे. जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी प्रार्थना केली. अत्यंत प्रसन्न वाटले. जगातील कोट्यवधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणाने मलाही खूप प्रेरणा दिली आहे अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
शीख समुदायाप्रती अधिक आत्मीयता व्यक्त करताना मोदी म्हणाले की, आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरु साहेबांचीच कृपा आहे. चला, हा मंगल प्रसंग ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू पंतप्रधानांनी आपल्या या भेटीचे काही फोटोही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न घेता भेट
उल्लेखनीय म्हणजे, मोदी यांच्या या दौ-यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात नव्हती. तसेच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते. विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.
नेपाळची संसद विसर्जित; राष्ट्रपतींनी संसद केली बरखास्त