23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींची संपत्ती जाहीर

पंतप्रधान मोदींची संपत्ती जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर केली आहे. तसेच अन्य दहा मंत्र्यांचीही संपत्ती जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत वर्षभरात २६ लाखांनी वाढ झाली आहे. पीएमओने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पंतप्रधानांकडे एकूण २.२३ कोटींची संपत्ती आहे. यातील बहुतांश बँकांमध्ये ठेवी आहेत.

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. कारण, त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली होती. नरेंद्र मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही. परंतु, त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची एकूण किंमत १.७३ लाख आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या