34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeराष्ट्रीयपीएम केअर्समधील रक्कम एनडीआरएफला निधी हस्तांतरित करण्याची याचिका फेटाळली

पीएम केअर्समधील रक्कम एनडीआरएफला निधी हस्तांतरित करण्याची याचिका फेटाळली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने पीएम केअर्स फंडमध्ये जमा झालेल्या निधीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल दिला असून पीएम केअर्स फंडातील रक्कम राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत (एनडीआरएफ) जमा करण्यास वा हस्तांतरित करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.

सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वंयसेवी संस्थेने पीएम केअर फंडबद्दल आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पीएम केअर फंड आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून तयार करण्यात आला असून आपत्तीच्या व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही व्यक्ती व संस्थेद्वारा करण्यात आलेली मदत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार एनडीआरएफकडे हस्तांतरित करायला पाहिजे, असे सांगत पीएम केअर फंडातील निधी एनडीआरएफकडे हस्तांतरित करण्याची मागणी संस्थेने याचिकेद्वारे केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पीएम केअर फंडासंदर्भात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमध्ये पीएम केअर फंडातील निधी जमा अथवा हस्तांतरित करता येणार नसल्याचे सांगितले.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकारने या रोगाच्या विरोधातील उपाययोजनांसाठी पीएम केअर्स फंड निर्माण केला होता. केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना या फंडात मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर देशासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. या फंडात जमा होणारा निधी कोरोनासंदर्भात उपाययोजनांसाठी वापरला जाणार असल्याचेही केंद्राच्या वतीने सांगण्यात आले होते.

निराशेचे मळभ दूर करून पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या