27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeराष्ट्रीयपीएसएलव्ही-सी५४ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

पीएसएलव्ही-सी५४ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

एकमत ऑनलाईन

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखी एक गगन भरारी घेतली आहे. आज पीएसएलव्ही-सी५४ रॉकेट लाँच करण्यात आले आहे. इस्रोकडून ओशनसॅट-३ सह ८ नॅनो सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलवी-सी ५४ -इओएस-०६ रॉकेटने उड्डाण केले आहे. या रॉकेटमधून ओशनसॅट-३ उपग्रह आणि ८ नॅनो म्हणजे लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेट लाँचरची ही २४ वी मोहीम आहे.

ओशनसॅट-३ हा १००० किलो वजनाचा उपग्रह आहे. हा उपग्रह समुद्र आणि पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. याशिवाय भारताच्या सागरी क्षेत्रासह मित्र देशांच्या सागरी भागातील क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषणाची तपासणी करण्यास मदत करेल. या सॅटेलाईटमुळे संभाव्य चक्रीवादळाची माहिती मिळू शकेल, त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल. पीएसएलव्ही-सी५४ रॉकेटमधून ईवोएस-०६ आणि आठ छोटे सॅटेलाईट अंतराळात सोडले जातील. यामध्ये पिक्सेलमधून आनंद आणि भूटानसॅट, ध्रुव अंतराळमधून दोन थायबोल्ट तर स्पेसफ्लाइट युएसएमधून चार अशा एकूण आठ छोट्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये भूटानसॅट, थायबोल्ट-१, थायबोल्ट-२, आनंद आणि चार अ‍ॅस्ट्रोसॅट या छोट्या उपग्रहांचा समावेश आहे.

भूटानसॅट
ओशनसॅट व्यतिरिक्त या प्रक्षेपणात आठ नॅनो सॅटेलाईट म्हणेज छोटे उपग्रहही अंतराळात पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपग्रह भूटानसॅट आहे. भूटानसॅट हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. नॅनो हा उपग्रह आहे. हा उपग्रह जमीन, रस्ते, रेल्वे ट्रॅक, पूल यासंबंधित माहिती गोळा करेल.

इस्रोची मोठी मोहीम
इस्रोची ही मोठी मोहिम आहे. यामध्ये हे रॉकेट उपग्रहांना दोन कक्षेत घेऊन जाणार आहे. उड्डाणानंतर २० मिनिटांनी ओशनसॅट उपग्रह पृथ्वीपासून ७४२ किमी उंचीवर सोडला जाईल.

सर्वांत लांब मोहीम
शास्त्रज्ञ याला आतापर्यंतच्या सर्वात लांब मोहीमांपैकी एक मानत आहेत. यामध्ये रॉकेट उपग्रहाला दोन कक्षेत घेऊन जाईल. प्रक्षेपणाच्या २० मिनिटांनंतर, ओशन-सॅट पृथ्वीपासून ७४२ किमी उंचीवर सोडले जाईल. त्यानंतर ५१६ ते ५२८ किमी अंतरावर इतर उपग्रह अवकाशात सोडले जातील.

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या