22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयभारतात प्रदुषणयूक्त हवा - डोनाल्ड ट्रम्प यांची चीनबरोबर भारतावरही टीका

भारतात प्रदुषणयूक्त हवा – डोनाल्ड ट्रम्प यांची चीनबरोबर भारतावरही टीका

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीकडे सध्या जगाचं लक्ष लागले आहे़ सध्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे आमने सामने आहेत. दोन्ही उमेदवारांमधील अध्यक्षीय निवडणुकीतील चर्चेची शेवटची फेरी आज झाली. या फेरीत भारताविषयी एरवी गोडवे गाणा-या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलावरून टीका केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातील चर्चेची शेवटची फेरी शुक्रवारी संपली. या फेरीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाच्या मुद्यावर भूमिका मांडताना भारतासह चीन, रशियावर टीका केली. ट्रम्प यांनी हवामान बदलाच्या दिशेने भारताकडून केल्या जाणा-या कामावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. हवामान बदलाच्या लढाईत भारत, चीन आणि रशियाचा काम चांगले नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेत गेल्या ३५ वर्षात सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. चीनकडे पहा. किती घाणेरडी हवा आहे. रशियाकडे पहा किती घाण आहे. भारताकडे पहा किती घाणेरडी हवा आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

भारतात नाराजी सूर
ट्रम्प यांच्या विधानावरून भारतात नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या नेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताविषयीचे विधान दुर्दैवी असल्याचे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. हवामान बदलाच्या विरोधातील लढाईसाठी भारत कटिबद्ध आहे. दुसरीकडे अनेक अमेरिकन लोकांमुळे अमेरिकेने माघार घेतली, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली आहे.

राज्यात अमेरिकेच्या टेस्ला कंपनीचा प्रकल्प सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या