25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयलसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा

लसीची ऑर्डर दिली नसल्याचा पूनावालांचा आरोप खोटा; केंद्र सरकारचा खुलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या लसींची नवी ऑर्डर केंद्र सरकारने दिलीच नसल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या आरोपांच्या बातम्यांना आता केंद्र सरकारने उत्तर दिले असून, या प्रकारच्या बातम्या या निराधार आहेत, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने सोमवार दि़ ३ मे रोजी दिले आहे़ अदर पूनावालांनी केलेल्या आरोपावर आता केंद्र सरकार आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र सरकारने ऑर्डरच दिली नसल्याचा आरोपावर आपला बचाव करण्याचा प्रयत्न या खुलाशातून करण्यात आला आहे. लसीची ऑर्डर न मिळाल्याचे अदर पूनावालांनी केलेले आरोप आता केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. केंद्र सरकारने सीरमकडे १० कोटी तर भारत बायोटेककडून २ कोटी लसींची ऑर्डर देण्यात आली होती, असे सांगितले आहे. सरकारने या सीरमला १,७३२.५० कोटींची रक्कम दिली आहे, ज्यामधून मे, जून आणि जुलै महिन्यात आपल्याला लस मिळतील, असे केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे़

याशिवाय भारत बायोटेककडे दोन कोटींच्या लसीची ऑर्डर देण्यात आली आहे. या लसी पुढच्या तीन महिन्यात येतीलच. मात्र सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडे मिळून ७५ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. याशिवाय आणखी ५९ लाख लसींचे डोस येत्या तीन दिवसात उपलब्ध होतील. या कथित बातम्यांनुसार, दोन लस निर्मात्यांना मार्च २०२१ मध्ये दिलेल्या शेवटच्या ऑर्डर्सनुसार सीरम इन्स्टिटयूटला १०० दशलक्ष डोसची ऑर्डर तर भारत बायोटेकला २० दशलक्ष डोसची ऑर्डर देण्यात आली होती. माध्यमांतील ऑर्डर न दिल्याच्या बातम्या या पूर्णपणे खोट्या आहेत. या बातम्या वास्तवावर आधारलेल्या नसल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयाने एका प्रेस रिलीजद्वारे दिला आहे.

उत्पादन क्षमता वाढविण्याची गरज नाही?
या प्रकारची बातमी सर्वांत आधी बिझनेस डेलीमध्ये आणि त्यानंतर सगळीकडे आली. या बातमीनुसार, अनेक लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा असूनदेखील केंद्र सरकारने लसीची ऑर्डर या दोन्हीही कंपन्यांना दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोव्हीशील्ड लसीच्या उत्पादनाची क्षमता ते का वाढवत नाहीत? असा सवाल पूनावालांना विचारण्यात आला असता, त्यांनी म्हटले होते की, सरकारकडून लसीची आणखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळे वर्षाला १ अब्ज डोसच्या वर उत्पादनाच्या वर उत्पादन करण्याची गरज कंपनीला वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले होते़

कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या