24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयप्रधानमंत्री किसान योजनेत घोटाळा

प्रधानमंत्री किसान योजनेत घोटाळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान(पीएम) किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी न करणा-यांच्या खात्यांमध्येही पैसे जामा झाल्याची प्रकरणे आता समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता थेट आधारकार्डांसंदर्भातील सर्व कामकाज पाहणा-या युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी प्रमुख राम सेवक शर्मा यांच्या नावाने ही फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत सातवा हप्ता केंद्र सरकारने शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेतंर्गत शेतक-यांना वर्षभराच्या कालावधीमध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये पाठवले जातात. मात्र आता या योजनेमध्ये फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक ठिकाणी या योजनेसाठी पात्र नसणा-या व्यक्तींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याच्या बातम्या समोर येत आहे.
द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार शर्मा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर एका वर्षामध्ये तीनवेळा पीएम सन्मान निधी अंतर्गत एकूण सहा हजार रुपये पाठवण्यात आलेत. शर्मा यांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवलेले नाही़ तरीही त्यांचा खाते क्रमांक या योजनेंतर्गत नोंदवण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकार जबाबदार असून त्यांनी पैसे पाठवण्यापूर्वी खाते क्रमांकाशी संबंधित कोणतीही तपासणी केली नाही, असा दावा शर्मा यांनी केला आहे.

शर्मा यांनी पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत माझ्या खात्यावर दोन हजार रुपयांचा निधी तीन हप्त्यांमध्ये जमा झाल्याची माहिती दिली. शर्मा यांच्या नावाने असणा-या ज्या खात्यामध्ये हे पैसे जामा झालेत ते खाते ८ जानेवारी २०२० रोजी सुरु करण्यात आलेल. हे खाते नऊ महिने सुरु राहिले आणि नंतर २४ सप्टेंबरला ते बंद करण्यात आले. या खात्यानुसार शर्मा यांचे नाव उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणून नोंदविण्यात आले होते़ शर्मा यांना आपल्या नावाने खाते सुरु करण्यात आले आहे़ हे समजले तेव्हा त्यांनीच यासंदर्भात बँकेला माहिती दिली. मात्र त्यावर बँकेकडून काहीही उत्तर आले नाही. मात्र बँकेने शर्मा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेले खाते बंद केले. मी या योजनेसाठी पात्र नसल्याचे शर्मांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी अभिनेत्यांच्या खात्यांवर पाठविले पैसे
यापूर्वी अभिनेता हनुमान, आयएसआयचा हेर महबूब अख्तर अभिनेता रितेश देखमुखच्या नावेही शेतकरी म्हणून वापरुन खाती उघडण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या व्यक्तींचे आधारकार्ड सार्वजनिक स्तरावर उपलब्ध आहेत़ त्यांच्या नावाने ही फसवणूक केली जाते. हनुमान यांच्या खात्यावर सहा हजार, अख्तरच्या खात्यावर चार हजार तर रितेशच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्यात आले होते.

विरोधकांकडून शेतक-यांना भडकवण्याचे काम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या