30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home राष्ट्रीय चीनपेक्षा भारतीय लसीला पसंती

चीनपेक्षा भारतीय लसीला पसंती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: सध्या भारतात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरु आहे. तर, परदेशातूनही कोविशील्ड लसीची मागणी केली जात आहे. आता पर्यंत सीरम इनस्टिट्यूटने कोविशील्ड लसीचे ५० लाख डोस विविध देशांना दिले आहेत. कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत भारतीय लसींनी चीनच्या लसींना मागे टाकल्याचे चित्र आहे.

ब्राझील, कंबोडियाची कोविशील्डला पसंती
ब्राझील आणि कंबोडिया या देशांनी चीनकडून कोरोना लसीचे डोस घेतले होते. चीनच्या कोरोना लसीच्या परिणामकारकतेविषयी शंका निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांनी कोविशील्डला पसंती दिली आहे. सीरम इनस्टिट्यूटने ब्राझीलला २० लाख लसीचे डोस दिले आहेत.

इंडोनेशियाला हवीय भारतीय लस
इडोनेशियाला कोरोना लसीकरणसाठी चीनने कोरोनावॅकचे तीस लाख डोस दिले होते. मात्र चाचणीमध्ये त्या लसीची परिणामकारकता केवळ ६५.३ टक्के असल्याचे आढळून आल्याने इंडोनेशियाला कोविशील्ड लसीचे डोस हवे आहेत.

कंबोडियाची भारताशी चर्चा
कंबोडियानेही भारतात तयार झालेल्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध व्हावी असे म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या