22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयगर्भवती गाईवर बलात्कार, आरोपीला अटक

गर्भवती गाईवर बलात्कार, आरोपीला अटक

एकमत ऑनलाईन

कोलकाता : माणुसकीला काळीमा फासणारी घटना पश्चिम बंगालमधून घडली आहे. गरोदर गाईवर बलात्कार केल्याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणाला बुधवारी अटक करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील नामखाना ब्लॉकमधील उत्तर चंदनपिडी या भागात घडली आहे. गाभण असलेल्या गाईच्या मालकाने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपी प्रद्युत भुईया याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील उत्तर चंदनपिडी येथील रहिवासी आरती भुईया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली होती की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी प्रद्युत भुईया याने त्यांच्या घरामागील गोठ्यात प्रवेश केला आणि आरती भुईया यांच्या एका गायीवर ‘पाशवी बलात्कार’ केला. मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कारानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने गायीचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी प्रद्युत भुईया याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मंगळवारी त्याला काकद्वीप उपविभागीय न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने प्रद्युत भुईया याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या