19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरणाच्या नियोजनासाठी कोविन अ‍ॅपची तयारी

लसीकरणाच्या नियोजनासाठी कोविन अ‍ॅपची तयारी

कोरोना लसीसंदर्भात सर्व माहिती ; अधिका-यांनाही ठरणार फायदेशीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : युरोपातील अनेक राष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही दुसºया लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र, येत्या दोन महिन्यात प्रभावी लस येईल, अशी शक्यता आहे. मात्र तरीही संपूर्ण भारताचे लसीकरण होण्यास २०२४ साल उजाडेल असे सांगितले जात आहे. लसीकरणाच्या नियोजनासाठी आता भारत सरकारने एक अ‍ॅप काढायचे ठरवले आहे.

भारत सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याची तयारी दर्शवली आहे. यादरम्यानच सरकारने कोविन अ‍ॅप नावाचे एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणण्याचीही तयारी दाखवली आहे. हे अ‍ॅप कोरोना व्हायरसच्या लसीसंदर्भात आहे. या अ‍ॅपमध्ये कोरोना लसीसी निगडीत प्रत्येक माहिती उपलब्ध असेल. केंद्र सरकारकडून आणल्या जाणा-या या अ‍ॅपमुळे कोणत्या व्यक्तीला लस मिळाली आहे, हे देखील समजेल.

तसेच किती लस खरेदी केल्या गेल्या आहेत. सोबतच किती शिल्लक आहेत, याची माहिती या मिळेल. ज्याला कोरोनाची लस दिली जाणार आहे त्याला याबाबतची सूचना हे अ‍ॅप आधीच देईल. कोविन अ‍ॅपबाबत केंद्र सरकारचे असे म्हणणे आहे की, या अ‍ॅपद्वारे डाटा अपलोड करण्यासोबतच डाटा प्राप्त करण्यामध्येही ते सहाय्यक ठरेल. याद्वारे प्रत्यक्ष मैदानात काम करणारे अधिकारी अधिक सक्षम होतील. राज्य सरकारद्वारे केंद्र सरकारला कोरोना लशीचा डाटा उपलब्ध करुन देण्यामध्येही हे अ‍ॅप मदतनीस सिद्ध होईल.

कोविन अ‍ॅपमध्ये आयसीएमआर, आरोग्य मंत्रालय आणि आयुष्यमान भारत सारखे विभाग सामील आहेत. कोविन अ‍ॅप एक लसीकरणाचे प्रमाणपत्र देखील निर्माण करेल. तसेच या प्रमाणपत्राला डिजीलॉकरमध्ये संग्रहित करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करुन देईल. त्यामुळे पारदर्शकता अधिक येईल. तसेच शेवटच्या माणसापर्यंत लस पोहोचवण्याचे काम सोपे होईल.

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या