22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयआमदारांना भाजपविरोधी राज्यात पाठविण्याची तयारी

आमदारांना भाजपविरोधी राज्यात पाठविण्याची तयारी

एकमत ऑनलाईन

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारवर सध्या मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. भाजपच्या संभाव्य आमदार खरेदीच्या संकटाला तोंड देण्यासाठी सोरेन आमदारांना भाजपविरोधी सत्ता असलेल्या राज्यात पाठविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आमदारांना पश्चिम बंगाल किंवा छत्तीसगडमध्ये पाठविले जाऊ शकते असे सुत्रांनी सांगितले.

झारखंडमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरविण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी, उदयोन्मुख परिस्थितीला तोंड देण्यासाठी धोरणात्मक तयारी पाहता सत्ताधारी आघाडीच्या आमदारांच्या बैठकीची तिसरी फेरी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू आहे. सत्ताधारी आघाडीचे सर्व आमदार आपापल्या सामानासह बैठकीला उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस शनिवारी सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवणारा आदेश भारतीय निवडणूक आयोगाला पाठविण्याची शक्यता आहे असे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की आमच्या आघाडीच्या आमदारांना छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमध्ये पाठविण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये बिगर-भाजप सरकारे आहेत. आमदार आणि सुरक्षा कर्मचा-यांना रस्त्याने नेण्यासाठी तीन लक्झरी बस रांचीला पोहोचल्या आहेत. तसेच त्यांच्या संरक्षणात काही वाहने असतील असेही सांगण्यात आले आहे. आमदारांना ठेवण्यासाठी छत्तीसगडमधील बरमुडा आणि रायपूर तसेच पश्चिम बंगालमधील काही ठिकाणांसह तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. आणखी एका सूत्राने सांगितले की गरज पडल्यास सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी पाठवले जाईल, असही सुत्रांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या