23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रपतीपदाची निवडणूक, संसदेत ९९ टक्के मतदान

राष्ट्रपतीपदाची निवडणूक, संसदेत ९९ टक्के मतदान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून यामध्ये संसदेतील ९९.१८ टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती चिफ रिटर्निंग अधिका-यांनी दिली, तर राज्यातील २८३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपतीपद निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे, तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजता मतदान संपले. या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १० च्या सुमारास मतदान केले, तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास ४८०० खासदार आणि आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे ७७६ खासदार मतदार आहेत. खासदारांच्या मतांचे एकूण मूल्य ५ लाख ४३ हजार २०० एवढे आहे. तसेच सर्व राज्यांतील ४०३३ आमदार मतदार असून, प्रत्येक राज्यात मतांचे मूल्य वेगवेगळे आहे. मात्र, एकूण झालेले मतदान आणि एनडीएला मिळालेला पाठिंबा पाहता द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड आहे. यासंबंधीचा निकाल २१ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

एकूण मतदान
देशभरातील ४०२५ आमदारांपैकी ३९९१ आमदारांनी आणि ७७१ खासदारांपैकी ७६३ खासदारांनी मतदान केले. ही मतदानाची टक्केवारी ९९.१२ टक्के इतकी आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण ४८०९ मतदार असून, मतांचे एकूण मूल्य १० लाख ८६ हजार ४३१ एवढे आहे.

राज्यात २८३ आमदारांचे मतदान
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या २८७ पैकी २८३ आमदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे लक्ष्मण जगताप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख, नवाब मलिक हे चार आमदार मतदानाला उपस्थित नव्हते. प्रकृती ठीक नसतानाही भाजपच्या मुक्ता टिळक यांनी विधानभवनात येऊन मतदान केले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या