24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी अर्ज दाखल करताना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

दरम्यान, याआधी मुर्मू यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. भारताच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातून आलेल्या व त्याही महिला नेत्या विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या