28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयचाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव-आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन

चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव-आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येतेय. याच दरम्यान आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहिलंय. कोरोना चाचण्या वाढवण्यात येऊ नयेत यासाठी अधिका-यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप जैन यांनी आपल्या पत्रात केला आहे.

दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या रोखण्याचा आरोपही सत्येंद्र जैन यांनी गृह मंत्रालयावर केलाय. ‘काही अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिका-यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येतोय’ असं जैन यांनी म्हटलंय.

दिल्लीत निवडून आलेलं सरकार आहे आणि हे सरकार आपल्या जनतेसाठी निर्णय घेण्यात सक्षम आहे. असं असतानाही दिल्लीत कोरोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारला का रोखलं जातंय? असा प्रश्न विचारत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र लिहिलंय. दिल्लीच्या अधिका-यांवर या पद्धतीनं असंविधानिक आणि बेकायदेशीर दबाव का टाकला जातोय? तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये, असं जैन यांनी आपल्या पत्रात लिहिलंय.

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार हजेरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या