30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयकूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना रोखले

कूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना रोखले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात केंद्रीय दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात पाच जण मरण पावले. ही घटना सीतालकुची विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्र क्रमांक १२६ वर घडली. या केंद्रावरील मतदान स्थगित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल विशेष निरीक्षक आणि राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्­तांनी पाच वाजेपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. शनिवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आयोगाने कोणत्याही नेत्यास त्याठिकाणी जाण्यास ७२ तासांची बंदी घातली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्ष, निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांना टार्गेट केले आहे.

सीतलकुचीमधील ग्रामस्थांवर अंधाधून गोळीबार करण्यात आला आहे. अशा परिस्थिती नेत्यांना कूचबिहारला जाण्यापासून रोखणे हे निवडणूक आयोगाचे अभूतपूर्व पाऊल आहे. सीतलकुचीला जायची माझी इच्छा आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कुचबिहार जिल्ह्यातील माथाभंगा भागात केंद्रीय दलांनी गोळ्या घालून पाच जणांची हत्या केली. त्याचा जाब निवडणूक आयोगाने द्यावा, अशी मागणी तृणमूल काँंग्रेसने केली आहे. ही निवडणूक सुरू झाल्यापासून १७ ते १८ जणांची हत्या करण्यात आली. त्या एक डझन कार्यकर्ते आमच्या पक्षाचे आहेत. सध्या प्रशासनाचा ताबा आमच्याकडे नाही तर निवडणूक आयोगाकडे आहे, याकडे ममता बॅनर्जी यांनी लक्ष वेधले.

देशात २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या