23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयबोपखेलच्या इंग्लिश स्कूलसह पाच भारतीय शाळांचा गौरव

बोपखेलच्या इंग्लिश स्कूलसह पाच भारतीय शाळांचा गौरव

एकमत ऑनलाईन

लंडन : जागतिक पातळीवर गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय शाळांचा देखील डंका वाजत आहे. विविध श्रेणींमध्ये लक्षवेधी कामगिरी करणा-या १० शाळांच्या यादीमध्ये भारतातील पाच शाळा झळकल्या आहेत. यामध्ये पुण्यातील पीसीएमसीच्या इंग्लिश स्कूलचा समावेश आहे.
सामाजिक विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणा-या संस्थांना अडीच लाख डॉलरचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. मुंबईतील एसव्हीकेएमच्या छत्रभूज नर्सी मेमोरिअल स्कूल, नवी दिल्लीतील एसडीएमसी प्राथमिक शाळा लाजपत नगर-३ या दोन संस्थांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या मूलगामी कामाबद्दल त्यांचा दहा आघाडीच्या संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सामाजिक सहकार्याच्या क्षेत्रामध्ये भरीव काम केल्याबद्दल मुंबईतील खोज स्कूल आणि पुण्याच्या बोपखेल येथील पीसीएमसीच्या इंग्लिश मीडियम स्कूलची निवड करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लक्षवेधी कामगिरी करणा-या श्रेणीमध्ये हावड्यातील सामारितन मिशन स्कूल (हाय)ची निवड झाली आहे.

ब्रिटनमधील डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म टी-४ एज्युकेशनच्या पुढाकाराने जगातील सर्वोत्तम शाळांना गौरविण्यात येणार आहे. आरोग्यदायी जीवनशैलीला पाठिंबा देणा-या संस्थांना पुढील वर्षी गौरविण्यात येईल. पुरस्कार विजेत्या संस्थांची निवडही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांकडून करण्यात येईल.

संयुक्त राष्ट्रांनी गुणवत्तापूर्ण शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी २०३० च्या दिशेने सुरू असलेली आपली वाटचाल संथगतीने सुरू असल्याचे म्हटले होते. आता शिक्षणक्षेत्रामध्ये मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी या पुरस्कारांची सुरूवात केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या