30.4 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींनी वाटले ७१ हजार नियुक्तीपत्र

पंतप्रधान मोदींनी वाटले ७१ हजार नियुक्तीपत्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वार १० लाख कर्मचा-यांसाठी रोजगार मेळावा भरती मोहिमेअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये सुमारे ७१ हजार नवनियुक्त कर्मचा-यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली.

नियुक्तीपत्रे मिळालेले युवक कनिष्ठ अभियंता, लोको-पायलट, तंत्रज्ञ, निरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लघुलेखक आणि कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर आणि सुरक्षा अधिकारी या पदांसाठी पात्र आहेत. देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल. नियुक्ती पत्रांचे वितरण केल्यानंतर, पंतप्रधानांनी काही उमेदवारांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांनी त्यांचा जीवन प्रवास शेअर केला. १० लाख लोकांना नोक-या देण्यासाठी २०२२ मध्ये पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या रोजगार मेळा मोहिमेचा हा एक भाग आहे.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ‘रोजगार मेळा’ पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. कर्मयोगी मॅनेजमेंट मॉड्यूल हा विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व कर्मचा-यांसाठी ऑनलाइन इंडक्शन कोर्स आहे. यामध्ये सरकारी नोकरांसाठी आचारसंहिता, कामाच्या ठिकाणी नीतिमत्ता, सचोटी आणि मानवी संसाधन धोरणे यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या