22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयअरुणाचलमधील पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अरुणाचलमधील पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

एकमत ऑनलाईन

इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील पहिल्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे उदघाटन केले. याशिवाय पंतप्रधान मोदींनी ६०० मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केंद्रही राष्ट्राला समर्पित केले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करून शुभेच्छाही दिल्या. २०१९ मध्ये पंतप्रधानांनी या विमानतळाची पायाभरणी केली होती, तब्बल ६४५ कोटी रुपये खर्चून या विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की स्वातंत्र्यानंतर ईशान्य भाग अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिला. अटलजींचे सरकार आल्यावर पहिल्यांदाच या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न झाला. ईशान्येच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय असणारे हे पहिले सरकार होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या