नवी दिल्ली : १६ जानेवारीस भारतात जगातील सर्वांत मोठ्या कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील कोरोना योद्धयांना लस देण्यात येत आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते लस घेणार की नाही याबाबत सर्वसामान्यांच्यात उत्सुकता होती. तर काही लोकांनी लसीबाबत शंका उपस्थित करून नेते लसीबाबत सांशक आहेत असा आरोप होत होता. मात्र आता दुस-या टप्प्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेते हे लस घेणार असल्याचे समजत आहे.
सीरम संस्था आणि भारत बायोटेक या दोन मोठ्या संस्थांमार्फत देशात लस निर्मित केली आहे. कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन या नावाने ही लस देशात उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या देशातील कोरोना योद्धयांना ही लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता आणि तशा पद्धतीने लसीकरणास सुरूवात देखील झाली आहे. मात्र पंतप्रधान, राजकीय नेते यांनी लस घेतली नसल्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत सांशकता होती. या पार्श्वभूमीवर आता दुस-या टप्प्यात हे सर्व राजकीय नेते लस घेणार असल्याचे आता समोर येत आहे.
दोन्ही लस सुरक्षित – आरोग्य मंत्री राजेश टोपे