30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींची कोरोना संसर्ग संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पंतप्रधान मोदींची कोरोना संसर्ग संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अतसिंकट असलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रुग्णालयांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावत आहे, मुख्यमंत्री असूनही हतबल होण्याची वेळ आपल्यावर आली आहे, अशी व्यथा व्यक्त केली. तसेच दिल्लीत येणारे ऑक्सिजन टँकर इतर राज्यांत रोखले जात असतील तर मी केंद्र सरकारमध्ये कुणाशी बोलायचे असा सवाल उपस्थित करीत देशातील सर्व ऑक्सिजन प्लान्ट व त्यांचा पुरवठा लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अशातच शुक्रवारीच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे संत गंगाराम रुग्णालयातील २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचे सावट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चेह-यावर स्पष्टपणे दिसत होते. परिणामी केजरीवाल यांनी हात जोडून पंतप्रधानांना वेळेवर व पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा दिल्लीला व्हावा, यासाठी मागणी केली. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात एक राष्ट्रीय योजना आखण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

प्रोटोकॉल तोडल्याने केजरीवालांना रोखले
एकीकडे आपली संवेदना प्रभावीपणे व्यक्त करीत असतानाच केजरीवाल यांनी त्यांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपणाचेही नियोजन केले होते. बैठक सुरू असतानाच केजरीवाल यांच्या संबोधनाचा काही भाग टीव्हीवर लाईव्ह दिसला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांचे संबोधन रोखत त्यांना प्रोटोकॉलची आठवण करून दिली. यानंतर केजरीवाल यांनी माफी मागितली. बैठकीनंतर केंद्राकडून केजरीवाल हे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्लॅटफॉर्मचा वापर केजरीवाल राजकारणासाठी व खोट्या दाव्यांसाठी करत आहेत, असे केंद्रातील सुत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

राज्यातील १८ वर्षांवरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या