श्रावणी पौर्णिमेचा आजचा दिवस राखी पौर्णिमा म्हणून देशभर साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्यामधील जिव्हाळा जपणारा एक सण आहे. त्यामुळे या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याला तिचं रक्षण करण्याच्या कर्तव्याची आठवण करून देते. या दिवसाच्या मंगपर्वावर भारतामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भारतवासियांना आजच्या रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा देऊन हा सण आनंदाने साजरा करण्याचं आवाहन केले आहे.
रक्षा बंधन के पावन पर्व पर समस्त देशवासियों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना रक्षा बंधनाचा सण हा बहीण-भावाच्या प्रेमाचा असल्याचं सांगत या निमित्ताने महिलेचा सन्मान आणि सुरक्षा यासाठी अधिक कटिबद्ध होऊ असं म्हटलं आहे.
रक्षा बंधन पर सभी देशवासियों को बधाई! राखी प्रेम और विश्वास का वह अटूट धागा है जो बहनों को भाइयों से जोड़ता है। आइए, आज हम सब महिलाओं के सम्मान और सुरक्षा के लिए प्रतिबद्ध रहने का संकल्प दोहराएं।
— President of India (@rashtrapatibhvn) August 3, 2020
Read More लातूर जिल्ह्यात आणखी १६१ रुग्णांची भर