25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी करणार कोरोना लसीकरण अभियानाचे उद्घाटन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरंिन्सगच्या माध्यमाने १६ जानेवारीला कोरोना लसीकरण अभियानाला भारतात सुरुवात करतील. हे जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान असेल. यात संपूर्ण देश कव्हर होईल. यावेळी सर्व राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण ३००६ लसीकरण केंद्रे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधानांशी जोडले जातील. एवढेच नाही, तर या सर्व ठिकाणी साधारणपणे एकाच वेळी लशी टोचल्या जातील. उद्घाटनाच्या दिवशी प्रत्येक सेंटरवर १०० लाभार्थ्यांना लस टोचली जाईल.

हा लसीकरण कार्यक्रम आरोग्य सेवांशी संबंधित फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यासाठी असेल. हा कार्यक्रम विशेषत्वाने, सरकारी आणि खासगी या दोन्ही क्षेत्रांतील फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी चालवला जात आहे. लसीकरण कार्यक्रमात को-विनचाही वापर केला जाईल. हा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला एक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. याच्या सहाय्याने डोस स्टॉक, स्टोरेज तापमान आणि कोरोना लशीसाठी लाभार्थ्यांच्या व्यक्तिगत ट्रँिकगचा प्रत्यक्ष वेळ, यांसंदर्भात माहिती मिळेल. एवढेच नाही, तर हा डिजिटल प्लेटफॉर्म लसीकरण सत्रांच्या आयोजनाबरोबरच सर्व स्थरांवर कार्यक्रम व्यवस्थापनाला मदत करेल.

कोरोना महामारी, व्हॅक्सीन रोलआऊट आणि को-विन सॉफ्टवेअरसंदर्भातील प्रश्नांसाठी एक चोवीसतास कॉल सेंटर (१०७५) देखील सुरू करण्यात आले आहे. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे डोस आधीच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मुबलक प्रमाणात पोहोचवण्यात आले आहेत. यानंतर ते, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनी जिल्ह्या-जिल्ह्यांत पाठवले आहेत.

मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नाही; कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्माने मौन सोडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या