29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयऑक्सिजनच्या तुटवड्यावर पंतप्रधानांची त्रिसुत्री

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर पंतप्रधानांची त्रिसुत्री

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशभरातील विविध राज्यांत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाची बैठक घेतली. ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी करण्यात येणा-या मार्गांवर या बैठकीत चर्चा झाली. या उच्चस्तरीय बैठकीत अधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही आठवड्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

या उच्चस्तरीय बैठकीत अधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जात आहे. सध्यस्थितीत भारतातील २० राज्यांना दररोज ६,७८५ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता आहे, या मागणीनुसार २१ एप्रिलपासून या राज्यांना दररोज ६,८२२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

काय आहे त्रिसुत्री योजना?
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, या उच्चस्तरीय बैठकीत मोंदींनी ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी तीन उपाययोजना करण्याचे अधिका-यांना सांगितले आहे.
१)ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणे,
२) ऑक्सिजन वितरणाची गती वाढवणे
आणि
३) आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांचा वेगवान पद्धतीने वापर करणे.

राज्यात लॉकडाऊन सुरू, अंतरजिल्हाच नव्हे तर जिल्हांतर्गत संचारावरही निर्बंध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या