23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयअतिरिक्त नोटा छापून गरिबांना वाटणार नाही

अतिरिक्त नोटा छापून गरिबांना वाटणार नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या लाटेमुळे आलेल्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी भारत सरकार अतिरिक्त नोटा छापणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवार दि़ २६ जुलै रोजी येथे स्पष्ट केले़ निर्मला यांनी लोकसभेमध्ये आज ही माहिती दिली.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत गोष्टी अजूनही भक्कम असून, लॉकडाऊननंतर परिस्थितीत पूर्ववत होत आहे. सन २०२०-२१ च्या उत्तरार्धामध्ये आत्मनिर्भर भारतसारख्या योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे, असे निर्मला यांनी राज्यसभेमध्ये म्हटले आहे. तसेच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारत सरकार अतिरिक्त नोटा छापणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता निर्मला यांनी नाही असे लेखी उत्तर दिले.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भारताचा जीडीपीची वाढ ही १४.४ टक्के इतकी असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे निर्मला यांनी निदर्शनास आणून दिले. तर आरबीआयच्या नव्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने ४ जुलै २०२१ रोजी संमत केलेल्या अहवालानुसार भारताच्या जीडीपीची प्रत्यक्ष वाढ ही सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात ९.५ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दुस-या लाटेचा फटका बसल्याने पूर्वी १०.५ टक्के अपेक्षित वाढ ही आणखीन एका टक्क्याने कमी करण्यात आली आहे. मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून विकासदर व महागाईचे गणित योग्य पद्धतीने बांधत दिर्घकालीन विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही निर्मला म्हणाल्या.

अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यांना कानाडोळा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनेक तिहामाहींदरम्यान बँकेने अतिरिक्त चलन छापावे आणि सरकारने नोटा सर्व सामान्यांना तसेच छोट्या उद्योजकांना वाटावेत असा सल्ला काही अर्थतज्ज्ञांकडून देण्यात आला होता. कोरोना कालावधीमध्ये ज्या छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला त्यांना पैसे देण्याची मागणी केली जात होती. थेट आर्थिक मदत किंवा नोकरदारांना या अतिरिक्त छापण्यात आलेल्या पैशातून मदत करावी असे म्हटले जात होता. या अशापद्धतीने अतिरिक्त नोटा छापून त्या चलनात आणण्याला हेलिकॉप्टर मनी किंवा हेलिकॉप्टर ड्रॉप असे म्हणतात. मात्र जास्त प्रमाणात चलन छापल्याने महागाई वाढते.

आर्थिक मदत दिल्यास गुंतविण्याची भीती
थेट आर्थिक मदत केल्याने लोक ते पैसे खर्च करण्याऐवजी ते गुंतवतील असे मतही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेल्या मुद्द्यांनुसार मूलभूत सुविधा आणि मोठा परिणाम साधणा-या सुविधा उभारण्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शक्य होईल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

दुस-या लाटेचे गंभीर परिणाम नाहीत
अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये फार गंभीर परीणाम झाला नाही असे मत व्यक्त केले. स्थानिक स्तरावर कनटेन्मेंट झोन तयार करणे आणि वेगवान लसीकरणाचा फायदा आर्थिक परिस्थितीची फार पडझड न होण्यासाठी झाला.

निष्काळजीने कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या